कलेमुळे माझं शहर घडलं!

570
Subscribe to our newsletter

मला नेहमी प्रश्न पडतो. तसं त्यांच्याकडे आहे तर आपल्याकडे का नाही? तसं त्यांच्याकडे बांधलय तर आपल्याकडे का नाही? मी नेहमी तुलना केली. तुम्हाला सांगते पहिल्या लॉकडाऊन नंतर मी घराच्या बाहेर पडले, तेव्हा मला सारसबागेच्या बाहेर फुटपाथवर काम चालू असताना दिसले. मोठे दोन चार सिमेंटच्या ठोकळे दिसले. ते काय फरश्या टाकायचं काम चालू नव्हतं. तिकडे वेगळाच प्रकार घडत होता. पुन्हा काही दिवसांनी मी त्याच रोडने पुढे गेले. बघते तर सारसबागेचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसलं. एक स्कल्पचर साकारून नाव रचलं आहे.  आता सारसबागेत येणाऱ्यांसाठी ते आकर्षण बनलं आहे. त्याच्या सोबत उभा राहून सेल्फी सुद्धा घेऊ शकतो. अशी भन्नाट आयडिया बघून किती भारी वाटलं. हेच मला पाहिजे होतं.

खरंच पुण्याचं रूप पालटू लागलंय. माझं शहर बदलत आहे. शहरात कलाकृती घडते आहे. सहज जमल्यास स्वारगेट परिसरातून एक चक्कर टाका. फ्लायओवरच्या खालच्या बाजूस काही बूट घातलेले पाय उभे केले आहेत. त्यातून आपली संस्कृती रिफ्लेक्ट होते. फुटपाथवर दोन बग्गी उभ्या आहेत. ब्रिटीशकालीन बग्गीची हुबेहूब प्रतीम साकारली गेली आहे. तसेच एका खांबातून रिक्षा अर्धवट बाहेर आलेली आहे. तर एका खांबातून स्कूटर बाहेर आलेली आहे. सगळ्यांचा लाडका हॅरी पॉटर कसा भिंतीत शिरतो, तसाच फील आला मला. तसेच स्वारगेट जवळच असलेल्या तळजाई टेकडीवर फोटोशुटसाठी मस्त रोड आहे. तिकडे मोठ्या भिंतीवर चित्र रेखाटली आहेत. त्यात रंगीबेरंगी रंग भरले आहेत. मिशीवाला माणूस, छोटे monk, विठ्ठला सोबत वारकरी, कथकली, ताजमहाल अशी चित्र बघायला मिळतात. ती रंगीत पेंटिंग्ज बघून मनात आपसूक रंग भरले जातात. संध्याकाळच्या वेळेस भिंतीवर तिरपा प्रकाश पडला कि चित्र खूप खुलून दिसतात. तुम्ही फोटो काढल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ कलेने माणूस घडतो पण कलेने शहर सुद्धा घडतं.

काही दिवसांपूर्वी हडपसरमध्ये मोठा फ्लायओव्हर बांधण्यात आला. फ्लायओव्हरच्या खालच्या बाजूस वटछाया बांधण्यात आली. पृथ्वीवर फक्त आपल्या भारतात वडाचे झाड आढळते. म्हणून वडाच्या झाडाला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. निसर्ग आणि कलेला महत्त्व देत वटछायेची कलाकृती घडवण्यात आली आहे. निसर्गावर जर प्रेम असेल तर तो आपल्याकडून कला घडवून आणतो. या बद्दल तसंच काहीसं आपण म्हणू शकतो. कांटाळलेल्या मनाला एक चेंज म्हणून कलाकृतीचं दर्शन घेतलेच पाहिजे. का? कारण ज्याचा शोध चालू होता ते सापडेल. जे तुम्हाला पाहिजे होतं ते मिळेल. विचारांना क्लीयारीटी मिळू शकते. पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकतात. माझ्या सोबत घडलं आहे. तुमच्यासोबतही घडू शकतं. एकदम सोप्पं आहे सगळं! गाडीवर बसायचं आणि आपल्याच शहरातून फिरायचं. कलेतून मिळणारी उर्जा आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची. तो दिवस आठवणीच्या डायरीमध्ये नोंदवायचा. कायमचा!

अजून एक कलेचं उत्तम उदाहरण आपल्या पुण्यात आहे. कसबा पेठे. पुण्याच्या पेठांमध्ये पेठेत काही जुने वाडे आहेत, तर काही इमारती आहेत. खूप ठिकाणी चित्रकलेसाठी स्कोप आहे. स्ट्रीट आर्ट प्रोजेक्टच्या निमित्ताने एलीयन, स्पेस आणि मीरा बाईची चित्र रेखाटली गेली. त्याला मुरल पेंटींग्ज म्हणतात. आपल्यातला कलाकार हर्षवर्धन कदमने जीव ओतून चित्रकला साधली आहे. बीएन्नले आणि स्ट्रीट आर्ट फेस्टिवल दरम्यान हर्षवर्धनने येरवडा जेलची भिंती रंगवण्याचा ध्यास घेतला. त्याचे साथीदार सहभागी झाले. जेलची भली मोठी कंपाउंड वॉल जीव ओतून सगळ्यांनी रंगवली. ओसाड पडलेल्या भिंतीवर रंगाची उधळण झाली. आज त्या रस्त्याने येणारा-जाणारा प्रत्येक जण रंगाचा आनंद लुटतो. मांजरी मध्ये ‘पुणे झिरो कि.मी.’ संकल्पना साकारली गेली आहे. सध्या एस एम जोशी पुलावरून जाताना पुण्याचं दर्शन घडतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मूरल पेंटिंग्ज आहेत. तर पुण्यात बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी विविध कला साकारली गेली आहे. विद्येचं माहेर घर असलेलं पुणे शहर रंगाच्या सोबतीने खुलते आहे. बहरते आहे. पुणेकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

AD

निसर्ग, कला आणि माणुसकी एकमेकांशी इंडायरेक्टली कनेक्टेड असतात. निसर्ग आणि कलेची साधना केली तर माणुसकी आपसुक लाभते. अशी माणुसकी शहर घडवते. पुण्याचं नवीन रूप बघून आता माझं मत बदललं. जे त्यांच्याकडे आहे ते आपल्याकडे सुद्धा आहे. पण मी आता वेगळाच विचार मनात येतो. जे आमच्याकडे आहे ते तुमच्याकडे आहे का? सांगा!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More