आजोबांना घेऊन त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊस ला पोहचलो. दुपारची वेळ होती, जेवायला मासे आणि बिअर चा बेत होता. तू काय घेणार?
फक्त मासे!
घेत नाहीस की आमच्या बरोबर घेणार नाहियेस?
घेत नाही.
माझ्या या उत्तराने आमच्या पिढी वरचा जणू त्यांचा भरवसा उडल्याचा भास मला झाला.
दारूकाम चालू झालं आणि दोघांचे आवाजही वाढू लागले. तरुण पिढीला माझा एक सल्ला, आनंदी राहायचं असेल तर म्हाताऱ्यांची काळजी घ्यायला शिका आजोबा म्हणाले.
तुम्ही स्वार्थी वागताय असं नाही का वाटत तुम्हाला आजोबा?
तुमची मुलं आत्ता जे बघतील ते मोठेपणी करणार. तुम्ही फक्त तुमच्या मुलांकडे बघितलं तर ते पण तसेच करतील. पण तुम्ही जर मोठ्यांची काळजी घेतलीत तर ते पण पुढे तुमची काळजी घेतील. वृद्धाश्रमात जाऊन ये एकदा, मुलांशी कसं वागायचं नाही हे नीट कळेल तिकडे. आम्ही मुलांसाठी काय नाही केलं म्हणणारे आज तिकडे खितपत पडले आहेत. कारण घरातल्या म्हाताऱ्या कडे बघायला वेळ दिला नाही आणि स्वतः म्हातारं झाल्यावर मुलांनी दुर्लक्ष केलं.
Karma goes in circles.
AD
रात्री घरी आलो, सोसायटी चा सुरक्षा रक्षक जागेवर नव्हता. आजच्या काळाला अनुसरून लगेच security system बद्दल chairman ला तडकाफडकी पत्र मनात लिहून तय्यार झाले. हॉर्न वाजवून पण कोणी आले नाही मग गाडीतून उतरून gate उघडले आणि गाडी कडे जायला निघालो. माझ्याच गाडीचा प्रखर दिवा माझ्या डोळ्यात जात होता. इतक्या वेळा तो चालू ठेवून रात्रीचा घरी आलो होतो पण दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःकडे बघायला जमले नव्हते. इतक्यात security गार्ड पळत आला, मी गाडीचे दिवे बंद केले आणि गाडी गेट मधून आत घातली. साहेब हात धुवायला मागच्या बाजूला गेलो होतो. इतक्या रात्री जास्त गाड्या नसतात तेव्हा जेवून घेतो आम्ही.
मनातल्या मनात मी लिहिलेले email delete केलं. म्हाताऱ्या माणसांची काळजी आणि गेट मधून आत येताना गाडीचे दिवे बंद असे दोन नवीन नियम मी त्या दिवशी शिकलो.
“पाण्यातील मासा, झोप घेई कसा,
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे”