Categories
Kavadse

पप्पू पीचकू

गेम संपल्यावर घरी जातांना कुतूहलाने मी परत तोच विषय काढला. काय रे कोण पप्पू? अरे पप्पू नाही, पप्पू पीचकू अशोक हसून म्हणाला. मला काही कळले नाही पाहून अशोक बोलायला लागला.

बॅडमिंटन चा गेम चालू होता. अशोक आणि त्याचा पार्टनर १५-८ ने आघाडीवर होते. इतक्यात अशोक चा फोन वाजला. Sid जरा नाव बघतोस का? कोणाचा आहे कॉल? मी फोन जवळ जाऊन नाव बघितले, पप्पू पीचकू. मी अशोक ला ते सांगितले. मग ठीके, वाजु देत असं म्हणून त्याने गेम चालू ठेवला. २१-१० ने गेम जिंकून अशोक शेजारी येऊन बसला. घाम पुसत म्हणाला आलोच पप्पू शी बोलून आणि बाहेर निघून गेला.

गेम संपल्यावर घरी जातांना कुतूहलाने मी परत तोच विषय काढला. काय रे कोण पप्पू? अरे पप्पू नाही, पप्पू पीचकू अशोक हसून म्हणाला. मला काही कळले नाही पाहून अशोक बोलायला लागला.

अरे sid, work from home च्या जमान्यात बॉस चा फोन आला की stress वाढायचा. वेळी अवेळी फोन वाजयाला लागल्यावर असं लक्षात आले की त्याच्या बॉस ने त्याला ओरडले की तो ते मला भेट देत होता. इथून पुढचं मग सोपं झालं. बॉस च नाव फोन मधून delete केलं आणि पप्पू पीचकू लिहिलं. कारण बॉस हा त्याच्या बॉस चा पप्पू आहेच.

हे सगळं छान आहे रे पण त्याने तुझा stress कसा काय कमी झाला हे मी नाही समजलो? मी उगीच माझी शंका काढली.

अरे पीचकू म्हणजे पीचकणारा, जो स्वतःच घाबरट आहे त्याला काय घाबरायच? म्हणून पप्पू पीचकू. ह्या वाक्यावर आम्ही दोघेही मनापासून हसलो. पण तरी एक शेवटचा प्रश्न बाकी होता, “बॉस ने कधी चुकून फोन मध्ये नाव बघितले तर?”

अरे sid समोर असताना पप्पू कशाला फोन करेल मला? अशोक आत्मवश्वासपूर्वक म्हणाला. ह्या बोलण्यात मला तथ्य जाणवले.

घरी येऊन मी माझ्या फोन मध्ये एक नवीन नाव add केलं, पप्पू पीचकू. आता माझा पण stress त्यामूळे थोडा कमी झालाय.