Categories
Food

होम बेकर्सचं इंस्टा मार्केट

पण ती पैठणी बघून मी पोट धरून हसू लागले. कारण आई जी पैठणी बघत होती ना… तो खरं तर… पैठणी केक होता!

‘आईशप्पथ! काय भारी पैठणी आहे!’ आई जोरजोरात ओरडू लागली. ‘सॉलीड आवडलीये मला. ताईच्या लग्नात तुला अशीच पैठणी घेऊ!’ आता मात्र मी सुद्धा एक्साईट झाले. हातातलं काम सोडून आईकडे पळत सुटले. जाऊन बघते तर आईचं लक्ष फोनमध्ये. आई मला ती पैठणी दाखवू लागली. काय कौतुक सांगू लागली! पण ती पैठणी बघून मी पोट धरून हसू लागले. कारण आई जी पैठणी बघत होती ना… तो खरं तर… पैठणी केक होता! आईला हे सामजल्यावर आईने डोक्याला हात मारला आणि मी तिला मिठी मारली. खरंच तो केक अगदी हुबेहूब पैठणी सारखा बनवला होता. तसंच सोनेरी काठ. मोराचं नक्षीकाम. त्याच्यावर वेलबुट्टी. त्यात सगळे रंग भरलेले. खरंच गंमत वाटते. पैठणीचा केक!

असा केक बनवणं आर्ट आहे. दिसतं तेवढं सोप्पं नाही. पेंटर पेंटींग्ज करतो. शिल्पकार शिल्प घडवतो. पॉटर मातीच्या गोळ्याला आकार देऊन एक पॉट बनवतो. तसंच होम बेकर्स आपलं आर्ट घडवतात. घरच्या घरी केक बेक करतात. होम बेकर्सना ऑर्डर देण्याचा सध्या ट्रेंड आहे. कारण ते तुमच्या मर्जी प्रमाणे केक बनवून देतात. तुमच्या  अपेक्षेप्रमाणे! पाहिजे त्या आकारात. पाहिजे त्या फ्लेवरमध्ये. पाहिजे त्या थीमचा केक बनवून देतात. ठरलेल्या दिवशी केक डिलिव्हर केला जातो. ते सुद्धा खिशाला परवडेल अश्या किंमतीमध्ये! स्पेशल ओकेजनला मनासारखा केक पोटात गेला तर काही बोलायलाच नको. फक्कड मज्जा येते! पण त्या पूर्वी कंपल्सरी एक गोष्ट! केक बनवून झाला कि फोटो काढायचा. मग तो इंस्टाग्रामवर पोस्ट करायचा. इंस्टाग्रामचा फोटो बघून लाईक्स मिळतात. त्यामुळे सहज ऑर्डर्स पण येतात. कसंय ना आपण नेहमी आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवतो. इंस्टाग्राम स्टोरी किंवा पोस्ट बघून आपला विश्वास अजून डबल होतो. काही बेकर्स तर केक बनवतानाचा व्हीडीओ शेयर करतात. फोटो प्रेझेंटेबल करण्यासाठी आयडीयाज वापरतात. हा प्लॅटफॉर्म होम बेकर्ससाठी खूप फायद्याचा ठरतो.

काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामने बिजनेस फिचर्स अपडेट केले. त्यात बिजनेस प्रोफाईल बनवता येते. हॅशटॅग वापरून सर्च करू शकतो. टॅग करू शकतो. आपली पोस्ट प्रमोट करू शकतो. आपल्या जाहिराती लोकांना स्क्रोल करताना दिसतात. आपल्या सर्कलमध्ये असलेल्या लोकांपर्यंत मार्केटिंग होतं. होम बेकर्सना एकस्प्लोजर मिळते. अर्थात हे पेड आहे. पण एकदम कमी खर्चात होणारं काम! थोडक्यात जाहिरात करण्याचा स्वस्तातला ऑप्शन! पण खूप काही अचिव्ह करून देणारा ऑप्शन!

होम बेकर्ससाठी इंस्टाग्राम ‘मिडल मन’ आहे. ते कसं काय? गेले काही वर्ष श्रुती ननवरे होम बेकिंग करते. तिच्या ‘क्रिमी स्टोरीज’ प्रोफाईलचे फॉलोवर्स वाढत आहेत. नेमकं काय अपेक्षित आहे हे समजून घेणं म्हणजे पहिली पायरी! इंस्टाग्राममुळे कस्टमर सोबत डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतो. श्रुतीची क्रिएटीवीटी बघून केक बेकिंग वर्कशॉप घेण्याची संधी तिला मिळाली. हळूहळू ‘क्रिमी स्टोरीज’चा बिजनेस ग्राफ वाढला. कुठे घरोघरी जाण्याची गरज पडली नाही.

Home-based bakers
The Home bakers!

कुठल्याही एजन्सीची मदत लागली नाही. एक आत्मविश्वास तयार झाला. हळूहळू ऑर्डर्सची संख्या वाढली. लॉकडाऊनमध्ये ईशानी धाक्रसने होम बेकिंगचा प्रयत्न केला. एक दोन ट्रायल नंतर बेकिंग सिरीअसली सुरु केलं. आता ‘द फ्लेवर लेन’ची ती मालकीण आहे. इंस्टाग्रामचे स्टॅटीक्स चेक करून ईशानी पोस्ट करते. शक्यतो रात्रीच्या लोकांकडून वेळेस इंस्टाग्राम जास्त वापरले जाते. त्यामुळे त्या वेळेस पोस्ट झटकन प्रमोट होते. या पद्धतीने स्वतंत्रपणे बिजनेस उभा करू शकतो. आपली नव्याने ओळख निर्माण होते.

स्वत:च्या पॅशनमागे धावताना इन्सीक्यूरीटीज केव्हा कडेवर येऊन बसतात समजत नाही. आपण एका नंतर एक हर्डल्स क्रॉस करतो. फिनिश लाईनला टेकतो. हे बिजनेसमध्ये सुद्धा घडतं. एखादा नवीन बिजनेस सुरु करण्यासाठी कॅपिटलची गरज असते. इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी चांगल्या नेटवर्कची साथ लागते. थोडक्यात लेस कॅपिटलची आणि सोप्पं मार्केटिंग म्हणजे इंस्टाग्राम! वन क्रीएशन = वन पोस्ट. लोकांना काय ऑफर्स चालू आहे ते समजते. पोस्टच्या कमेंट्स वाचून प्रोडक्टची खात्री पटते. प्रभू राम आणि हनुमानाची जोडी म्हणजे बिजनेस मार्केटिंग आणि सोशल मिडिया. हे कॉम्बिनेशन तुम्हाला जमत असेल तर बिजनेस वाढणार! त्यासाठी इंस्टाग्राम एक मिसाईल आहे. एकदा लाँच केलं की अर्धी मॅरेथॅान कम्प्लीट होते. मॅरेथॅान वरून आठवलं. दादाच्या वाढदिवसाचा केक ऑर्डर करायचा आहे. मॅरेथॅान थीम केक ऑर्डर करू का? कशी वाटेल थीम? कुठे ऑर्डर करू? इंस्टाग्राम आहे ना! होम बेकर्स आहेत ना! लेट्स डू इट!