Categories
Kavadse

कप डे

To wear or not to wear. And what to wear? When to wear it?

कपड्यांचे चार प्रकार

घरात घालायचे कपडे जे आपण घरातच घालतो
घरात घालायचे कपडे जे आपण बाहेर पण घालतो
बाहेर घालायचे कपडे जे आपण बाहेरच घालतो
आणि बाहेर घालायचे कपडे जे आपण घरात घालतो

घरात घालायचे नवीन कपडे जर नसतील तर बाहेर घालायचे जुने कपडे देखील घरात घातले तर भाव खाऊन जातात. घरात घालायचे नवीन कपडे असतील तर ते बाहेर घातले तरी भाव खाऊ शकतात.

पण बाहेर जायचे नवीन कपडे घरात घातले तर त्या सारखे सुख नाही. बायकोची सुंदर मैत्रीण जेवायला येणार असते अश्या वेळी हेच कपडे आपल्या कामी येत असतात. तर इतकी मोठी प्रस्तावना अशा साठी की नवीनच लग्न झालं असेल तर नवीन पांढरा , बाहेर घालायचा shirt जर बायको च्या मैत्रिणीच्या स्वागताला घातला तर पहिल्याच धुण्यात त्याला पिवळा अथवा गुलाबी रंग चुकून लागू शकतो. माझ्या बाबतीत असे झाले देखील आहे.

तसेच जर टवाळक्या करायला अथवा मित्रांबरोबर पान खायला जेव्हा बाहेर जावं लागतं तेव्हा घरात घालायचे नवीन कपडे बाहेर न घातलेले उत्तम. इथे धुण्या पूर्वीच डाग पडतात.

सासरची माणसे जेव्हा येतात तेव्हा कमीत कमी बाहेर घालायचे जुने कपडे तरी इस्त्री केलेले असावे. ह्याच्या कडे माझ्या घरची लोकं येतात तेव्हा कपडेच नसतात असे संवाद मग टाळता येतात.

आत्ता हे सांगण्याची गरज म्हणजे दिवाळी जवळ आली आहे, कपड्यांचं जरा नियोजन करायला घ्या. प्लॅनिंग मध्ये कमी नको, execution चुकणारच आहे. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.