Categories
Kavadse

All the best

कुमार परिसर समोर foodzen नावाच्या दुकानात चहाची ऑर्डर देऊन मी आणि माझे friends स्थानापन्न झालो. बाजूला पांढऱ्या रंगाची कुत्री चुपचाप झोपली होती. आमच्या तिघांच्या आवाजाने तिची झोपमोड होवू नये म्हणून आम्ही जरा हळू आवाजात गप्पा मारत होतो. कागदी कपात चहा आला आणि त्याचा चटका बसू नये म्हणून त्याबरोबर तीन extra कागदी कप देखील आले. मग मालकाने आत जाऊन डॉग फूड चा डबा आणला आणि शेजारच्या बंद दुकानाच्या दारात ते एका प्लेट मध्ये काढून ठेवले. आम्ही त्या झोपलेल्या कुत्रीला जणू मराठी येते असे समजून जा खा ते वगैरे बोलायला लागलो. मालक जवळ आला आणि म्हणाला ती बहिरी आहे.

इतक्यात मग तीन पायाचा कुत्रा तिथे आला, त्याचा मागच्या बाजूचा पाय बहुदा अपघातात गेला असावा. ते प्लेट मधील डॉग फूड खाऊन तो आला तसा निघून गेला. थोड्या वेळाने एक घाऱ्या डोळ्याचा कुत्रा आला. मालकाने आतून मारी बिस्किटे आणली आणि ती रिकाम्या प्लेट मध्ये टाकली. त्याकडे दुर्लक्ष करून तो फक्त पाणी पिऊन निघून गेला.

इतक्या वेळ झोपलेली ती कुत्री उठली आणि वास घेत एक एक करून ती बिस्किटे तिने खाऊन टाकली आणि परत आमच्या पायाशी येऊन झोपली.

पुढे आमचं त्या दुकानात जाणं वाढले तसे लक्षात यायला लागलं की ह्या कुत्र्यांचा हा जवळपास रोजचाच दिनक्रम आहे. मग एके दिवशी त्या मालकाला विचारलं आज आम्ही देऊ का डॉग फूड चे पैसे तर त्याने politely नकार दिला.

Lockdown नंतर धंद्यावर झालेला परिणाम खूपच नकारात्मक असून देखील त्या मुक्या प्राण्यांवर त्यांच्या खाण्या पिण्यावर त्यांनी कोणताही परिणाम होवू दिला नव्हता.

एका गुरूवारी चहाला गेलो तर दुकान बंद होतं. एक दुकान सोडून बाजूला eatery cheese नावाचा कॅफे दिसला. आम्ही कॉफी ची ऑर्डर देऊन खुर्चीवर बसलो. थोड्या वेळाने कॉफी आली. तसेच आमचे तिघे लाडके dogs देखील आले. किराणा दुकानातून बिस्किटे आणायला मी उठणार इतक्यात मालकाने आतून पाणी आणि बिस्किटे आणून त्या तिघांना खायला दिले. Covid मुळे सगळ्यात जास्त नुकसान कदाचित restaurant सेक्टर च झालंय. पण त्यामुळे त्यांची माणुसकी आणि त्यांचा पुणेरी पणा मात्र कुठेही कमी झालेला नाहीये. ती कुत्री अश्या लोकांमुळेच सेफ आहेत.

रुमी चे एक सुंदर वाक्य आहे – The wound is the place where the Light enters you.