Categories
Kavadse

बादशाही

बायको मुलांना घेऊन टिळक रोड वर बादशाही ला एका सकाळी जेवायला जायचे ठरवले. पुण्यात आलो तेव्हा पहिले जेवण बादशाही ला केले होते.

बायको मुलांना घेऊन टिळक रोड वर बादशाही ला एका सकाळी जेवायला जायचे ठरवले. पुण्यात आलो तेव्हा पहिले जेवण बादशाही ला केले होते.

रविवार सकाळ चा मुहूर्त ठरला. गाडीत बसल्यावर मुलांची आणि बायको ची करमणूक करायची म्हणून म्हणालो, माहिती आहे का आपण जिकडे जेवायला जातोय ना तिथे आधी आपलं नाव पाटीवर लिहून घेतात. आणि नंबर आला की मग हाक मारतात. मज्जा ना?

बाबा Barometer ला देखील असेच असते की, तिकडे फक्त कॉम्प्युटर वर असे लिहितात.

मला दोन्ही जागा प्रिय, पण त्या पाटीवरच्या नावाची गम्मत त्यातला पुणेरी बाणा (पणा?) काही वेगळाच. मुलांची नाव येईपर्यत थांबायची तयारी अश्या तऱ्हेने झाली होती.

बादशाही ला पोहचलो आणि अलीकडे पार्किंग पण दिसले. बायको पोरांना दारात उतरवून मी गाडी मागे घेणार तर मधल्या वेळेत तिथे दुसरी गाडी येऊन थांबली होती. मग परत गाडी बादशाही च्या मागच्या गल्लीत घातली. गल्ली संपली पण पार्किंग नव्हते. डावीकडे गेलो तर काहीतरी मिळेल ह्या आशेने गाडी वळवली. सगळी गल्ली पार्किंग फुल. आता मोर्चा शास्त्री रोड कडे नेला. सगळं पुणे जणू नवी पेठेत गाडी लावून फिरायला गेल्या सारखी अवस्था होती. समोर सिग्नल हिरवा झाला आणि मी उजवीकडे वळलो . गणपतीच्या दुकानासमोर भिंतीलगत एक पार्किंग मोकळे होते. मनाला हायसे वाटले. तिथे गाडी लावली. उतरतांना पालिकेने भिंती सुशोभीकरणासाठी रंगविलेल्या मजकुराकडे लक्ष गेले, मला जोराने हसायला आले. नेहमीचे झाडे लावा झाडे जगवा असे नं लिहिता भिंतीवर भला मोठा मजकूर होता “आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करून घ्या” … इतक्यात माझ्या अनारकलीचा फोन आला, “अरे आहेस कुठे, आपला नंबर आलाय”. मी म्हणालो, “गाडी लांब पार्क केली आहे…” माझं वाक्य मधेच कापून ती म्हणाली, “लवकर ये. जातांना आम्ही येऊ तिथपर्यंत चालत.” मी परत भिंतीकडे बघून हसलो, आयुष्य खरच खडतर आहे!