पुण्याचा ‘हार्ट टू हार्ट’ प्रवास

3,933
Subscribe to our newsletter

जागतिक ह्रद्य दिनानिमित्त

माणसाचं ह्रद्य हे भावनांच केंद्र असत, बुद्धी जरी फक्त प्रॅक्टिकल विचार करत असली, तरी मन हे ह्रद्याच्या भरोशावर चालतं. आणि जीवन जगण्यासाठी ह्रद्याच असणं हे गरजेचंच नाही का?

सध्या करोनाचा अपवाद वगळला तर मृत्यूच्या बातम्या ऐकताना हृद्य रोगाने होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही कमी नाहीच. मात्र म्हणतात ना एका नाण्याला दोन बाजू असतात. हृद्य रोगाने होणारे मृत्यू ही जरी एक बाजू असली तरीही दुसरी सकारात्मक बाजू आहे, या ‘ह्रद्याचे’ प्राण वाचवणारी. या कामगिरीत पुणेही इतर शहरांच्या ओळीत उभे आहे. या गरजूंसाठी ‘ह्रद्याचे’ प्राण वाचविण्यात पुण्याने आपला यशस्वी पाया रोवलाय.

२०११मध्ये एक मल्याळम चित्रपट बनविण्यात आला होता ज्याचा रिमेक म्हणजे २०१६चा ‘ट्रॅफिक’ हा सिनेमा, तुम्ही बघितला असेलचं. हा चित्रपट एका सत्य घटनेचा आधार घेऊन बनविण्यात आला होता. २००८ मध्ये एका चेन्नई मधील ६ वर्षाच्या मुलीला निकडीने ह्रद्यप्रत्यारोपणाची गरज होती. १५ मिनटांच्या आत पोलिसांच्या मदतीने २० किलोमीटर अंतर कापून एका अपघातात नुकत्याच गेलेल्या युवकाचं ह्रद्य त्या मुलीपर्यंत पोहोचवण्यात आलं. डॉक्टर आणि पोलिसांच्या सहाय्याने त्या लहानग्या मुलीचे प्राण वाचवण्यात आले.

AD

अशा घटना केवळ चेन्नई सारख्या शहरातच घडतात किंवा सिनेमातच दाखवल्या जातात असे नाही तर पुण्यानेही असेच काही साहसी निर्णय घेऊन ह्रद्याचे प्रत्यारोपण केले आहे, जी आपल्या पुणेकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

२०१७ मध्ये पुणे हे राज्यातलं ह्रद्य प्रत्यारोपणामध्ये यशस्वी झालेलं तिसऱ्या क्रमांकच शहर ठरलं. पुण्यामध्ये करण्यात आलेलं हे पहिलं ह्रद्य प्रत्यारोपण. आजपर्यंत पुण्याने मुंबई, दिल्ली, चेन्नई सारख्या शहरांना 10 पेक्षा जास्त अशा ह्रद्यांचं दान केलं होतं. परंतु ह्रद्य प्रत्यारोपण करून जीव वाचवण्याची पुण्याची ती पहिली वेळ होती. ओस्मानाबाद येथील एका १४ वर्षीय मुलाचा फुटबॉल खेळताना अपघात झाला. उपचारादरम्यान त्याचे ब्रेन मृत म्हणून घोषित करण्यात आले. मात्र त्याच्या आईवडिलांनी हिमतीने निर्णय घेऊन आपल्या मुलाचे ह्रद्य दान करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील ह्रद्यविकार असलेल्या एका ४९ वर्षीय महिलेला हे ह्रद्य दान करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने मार्गात ‘ग्रीन कॉरिडोर’ तयार करण्यात आला आणि ८६ मिनिटात २५२ किलोमीटर अंतर पार करून तातडीने हे ह्रद्य रुबी हॉल क्लिनिक येथे पोहोचविण्यात आले. या घटनेमुळे मुंबई आणि औरंगाबादनंतर पुणे शहरात देखील ह्रद्य प्रत्यारोपण होऊ शकतं हे निश्चित झालं. आणि याकरिता पुण्यातील डॉक्टरांची आणि पोलिसांच्या हिमतीचीही नक्कीच दाद द्यायला हवी.

२०१७ मध्ये पुणे हे राज्यातलं ह्रद्य प्रत्यारोपणामध्ये यशस्वी झालेलं तिसऱ्या क्रमांकच शहर ठरलं.

यावर्षी करोनाने जरी सर्वत्र बंदी आणली असली तरी माणसाचा जीव हा कुठल्याही परिस्थितीत महत्वाचा. आणि त्याकरता झटणारे लोकही तितकेच एकनिष्ठ. याच २०२०च्या ऑगस्टमध्ये पुण्यातील एका खासगी रूग्णालयात 39 वर्षीय महिलेचे ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते. चेन्नईमध्ये ह्रद्य फेल झालेल्या एका व्यक्तीकरता तातडीने त्या महिलेचे ह्रद्य प्रत्यारोपणासाठी चेन्नईला आणण्यात आले आणि करोना सारख्या अवघड परिस्थितीतही आपल्या ‘करोना वाँरीअर्स’ नी त्यांची कर्तव्य निष्ठा सिध्द केली.

आज दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा प्रत्येक जण आपापल्या परीने सामना करत असतोच परंतु वैयक्तिक असो व जागतिक एका हृदयाने दुसऱ्या हृदयास जपण्याचा हा आदर्श अश्याच काही घटना निर्माण करित असतात. आजच्या दिवसाला जागतिक ह्रद्य दिवसाचे महत्व तर आहेच पण त्याचबरोबर हे जीवनदायी कार्य साध्य करून पुण्यानेही आपल्या इतिहासात मानाचा तुरा खोवला आहे.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More